Posts

जिल्ह्यात सर्वदूर मतदानाचा जागर मतदार उत्साहित यंत्रणा सज्ज

Image
जिल्ह्यात सर्वदूर मतदानाचा जागर  मतदार उत्साहित  यंत्रणा सज्ज  आपले अस्तित्व सिद्ध करण्याची हीच सुवर्णसंधी          जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस मतदान केंद्रांवर आवश्यक सुविधांसोबत निरनिराळे व आकर्षक उपक्रम वाशिम,दि.२५ (जिमाका) मतदान प्रक्रिया ही लोकशाहीला परिपक्व करणारी आहे आपले मतदान आपले अधिकार वापरणे हे आपले अस्तित्व सिद्ध करण्याची सुवर्णसंधी आहे त्यामुळे २६ एप्रिल रोजी वाशिम जिल्ह्यातील प्रत्येक मतदाराने आपल्या अधिकार बजावून लोकशाहीला बळकट करावे असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी बुवनेश्वरी एस यांनी केले आहे.  मतदानाचा दिवस हा सण आणि उत्सव सारखा साजरा करावा. प्रत्येका मतदाराने स्वतःही मतदान करावे आणि आपल्या ओळखीतल्या सर्व पात्र मतदारांना मतदान करण्यास प्रेरित करावे असेही जिल्हाधिकारी यांनी आवाहन केले आहे.   जिल्हा प्रशासन या लोकसभा निवडणुकात जिल्ह्यातील मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी अहोरात्र मेहनत घेत आहे यापूर्वी गृह मतदानाच्या अनुषंगाने अधिकारी व कर्मचाऱ्यांनी प्रत्येक वृद्ध आणि दिव्यांग मतदारांच्या घरी जाऊन त्यांच्

मतदान प्रक्रिया पार पाडण्यासाठी जिल्हा प्रशासन सज्ज

Image
मतदान प्रक्रिया पार पाडण्यासाठी जिल्हा प्रशासन सज्ज 1 हजार 76 मतदान केंद्रांवर 7 हजार 719 कर्मचारी नियुक्त चोख पोलीस बंदोबस्त, मतदान केंद्रावर आवश्यक सुविधा उपलब्ध वाशिम, दि.24 (जिमाका)लोकसभा सार्वत्रिक निवडणूक- 2024 अंतर्गत दुस-या टप्प्यातील मतदानासाठी यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघाची मतदान प्रक्रिया शुक्रवार दि.26 एप्रिल रोजी सकाळी 7 वाजता सुरू होणार आहे. मतदानाची टक्केवारी वाढवण्याच्या अनुषंगाने जिल्हा प्रशासनाने विविध माध्यमातून जनजागृती केली आहे. जिल्ह्यातील नव मतदार आणि महिलांनीही या लोकशाही उत्सवात स्वयंस्फूर्तीने सहभाग घेऊन लोकशाहीला बळकट करण्यासाठी आपले मतदानाचे अधिकाराचे वापर करावे असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी श्रीमती बुवनेश्वरी एस यांनी केले आहे. जिल्ह्यात एकूण 9 लाख 79 हजार 237 मतदार आहेत. त्यापैकी 5 लाख 10 हजार 814 पुरुष, 4 लाख 68 हजार 407 महिला तर 16 तृतीयपंथीयांचा समावेश आहे.  वाशिम जिल्ह्यातील 33-रिसोड हा विधानसभा मतदारसंघ 6-अकोला लोकसभा मतदारसंघांतर्गत येतो. तसेच 34-वाशिम आणि 35- कारंजा विधानसभा मतदारसंघ हे 14-यवतमाळ-वाशिम लो

मतदान केल्यास रुग्णांना मिळणार 50 टक्के सवलत

Image
मतदान केल्यास रुग्णांना मिळणार 50 टक्के सवलत   मेडिकल असोसिएशनचा कौतुकास्पद उपक्रम   वाशिम,दि.24 (जिमाका) जिल्ह्यात लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीचे 26 एप्रिल रोजी मतदान होणार आहे. मतदान करून आलेल्या मतदारांना वाशिम मधील सर्व डॉक्टरांकडून   26, 27 आणि 28 एप्रिल रोजी ओपीडी तपासणी मध्ये 50 टक्के सवलत देण्याचा निर्णय IMA ,NIMA, IDA, आणि HIMA असोसिएशनकडून घेण्यात आल्याचे IMA,IDA,NIMA,HIMA च्या अध्यक्षांनी कळविले आहे.  मतदानाची टक्केवारी वाढावी, शेवटच्या मतदाराने आपला हक्क बजावा या उद्देशाने जिल्हा प्रशासन आणि अनेक संस्था वेगवेगळ्या उपक्रमांच्या माध्यमातून मतदारांना आकर्षित करण्यासाठी अनेक पावले उचलत आहे. याचाच भाग म्हणून IMA,IDA,NIMA,HIMA वाशिम तर्फे मतदान केलेल्या मतदारास ओपीडीच्या फीस मध्ये 50% सवलत देण्याचे ठरविण्यात आले आहे.   मतदारांना मतदान केंद्रांपर्यंत पोहोचवून त्यांच्याकडून मतदान करून घेणे तसेच लोकशाही बळकट करण्यासाठी एलोपैथिक, आयुर्वेदिक,होम्योपैथिक व दंत वैद्यकीय असोसिएशन तर्फे घेण्यात येत असलेल्या या कौतुकास्पद उपक्रमाचा सर्व गरजू रुग्णांनी लाभ घ्यावा असे आवाहन IMA, ID

जेवणात 10 टक्के सवलत - 50 रुपयात चित्रपट - कामगारांना पगारी रजा मतदारांसाठी आयएमकडून रुग्णांना फी सवलतीनंतर विविध आस्थापनांचाही पुढाकार

Image
जेवणात 10 टक्के सवलत - 50 रुपयात चित्रपट -  कामगारांना पगारी रजा मतदारांसाठी आयएमकडून रुग्णांना फी सवलतीनंतर विविध आस्थापनांचाही पुढाकार  वाशिम,दि. 23 (जिमाका ) जिल्ह्यात लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीचे 26 एप्रिल रोजी मतदान होणार आहे. मतदान करून आलेल्या मतदारांना 26,27 आणि 28 एप्रिल रोजी हॉटेल ईव्हेंटो , दानिश एम्पायर आणि मनीप्रभा येथे 10 टक्के सवलत तसेच एच टू एम सिनेमागृह येथे 50 रुपयांमध्ये चित्रपट पाहता येणार आहे. अशच प्रकारे जिल्ह्यातील विविध आस्थापनांनी त्यांच्याकडील कामगारांना मतदान केल्यास पगारी रजा देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यापूर्वी इंडियन मेडिकल असोसिएशनतर्फे मतदान करून आलेल्या मतदारांना 26, 27 आणि 28 एप्रिल रोजी ओपीडी तपासणी मध्ये 50 टक्के सवलत देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मतदानाची टक्केवारी वाढावी, शेवटच्या मतदाराने आपला हक्क बजावा या उद्देशाने जिल्हा प्रशासन आणि अनेक संस्था वेगवेगळ्या उपक्रमांच्या माध्यमातून मतदारांना आकर्षित करण्यासाठी अनेक पावले उचलत आहे. मतदारांना मतदान केंद्रांपर्यंत पोहोचवून त्यांच्याकडून मतदान करून घेणे तसेच लोकशाही बळकट करण्यासाठी

जिल्हाधिकारी टाळ वाजवी, सिईओंच्या हाती खंजिरी मतदानाचा टक्का वाढविण्या शहरात निघाली वारी ! मानवी साखळी तथा रॅली उत्साहात

Image
जिल्हाधिकारी टाळ वाजवी, सिईओंच्या हाती खंजिरी मतदानाचा टक्का वाढविण्या शहरात निघाली वारी ! मानवी साखळी तथा रॅली उत्साहात वाशिम,दि.२३ (जिमाका) मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी जिल्हा प्रशासन सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. आज जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस. आणि जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी वैभव वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली स्वीप अंतर्गत आज दि. २३ एप्रिल २०२४ रोजी सकाळी ८ वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक ते छत्रपती शिवाजी महाराज चौक दरम्यान सर्व अधिकारी व कर्मचारी यांच्या *मताधिकार जाणीव जागृती करीता मानवी साखळी तथा रॅलीचे आयोजन* करण्यात आले होते.     या रॅलीत जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस, मुख्य कार्यकारी अधिकारी वैभव वाघमारे, सहाय्यक जिल्हाधिकारी अपूर्वा बासूर, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी राजेंद्र जाधव,स्वीपचे नोडल अधिकारी जीवन आढाव,उपवनसंरक्षक अभिजीत वायकोस, मुख्याधिकारी निलेश गायकवाड आदींची प्रमुख उपस्थिती होती.  यावेळी स्थानिक लोककलावंतांनी मतदार जनजागृती गीत गाऊन जनजागृती केली. रॅलीमध्ये बाकलीवाल शाळेतील एनसीसीच्या विद्यार्थीनींसह महसूल विभाग, जिल्हा परिष